*येल्लोरी (टेंभी) येथे हमीभावाने हरभरा (चना) खरेदी सुरू*
*औसा (प्रतिनिधी)* औसा तालुक्यातील येल्लोरी (टेंभी) येथे महाकिसान संघ आणि नाफेडच्या वतीने प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्रावर शेतकऱ्यांना हमीभावाने हरभरा (चना) विक्री करण्याची संधी मिळणार आहे.
शेतकऱ्यांना रु.5650/- प्रति क्विंटल या शासकीय दराने हरभरा विक्री करता येईल. हमीभावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा (चना) विक्रीसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे २०२४-२५ या वर्षीच्या पिकांची ई-पिक नोंदणी असलेला सातबारा (८ अ),आधार कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक झेरॉक्स,मोबाईल क्रमांक जमा करने आवश्यक आहे.येल्लोरी (टेंभी) येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून,हमीभाव मिळवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चेअरमन शेख रियाज जाफरसाब यांनी या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या आर्थिक हितासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी शेतकरी शेख रियाज जाफरसाब यांच्या 9970160711 / 9881449465 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.तसेच शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाची विक्री शासकीय हमीभावाने करण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन शेख रियाज जाफरसाब यांनी केले आहे.
0 टिप्पण्या