अर्ध मसला येथील मस्जीद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा..

 अर्ध मसला  येथील मस्जीद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीवर  देशद्रोहीचा  गुन्हा दाखल करा..




औसा प्रतिनिधी 

जामा मस्जीद अर्धमसला ता. गेवराई जि. बीड या मस्जीद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर UAPA, NSA, NIA अंतर्गत गुन्हा दाखल करुन कार्यवाही करा याबाबत औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्याचे सविस्तर वृत्त असे 

 दि. २९/०३/२०२५ रोजी मौजे अर्धमसला ता. गेवराई जि. बीड येथील जामा मस्जीदमध्ये मध्यरात्रीच्या नंतर काही दहशतवादी लोकांनी दोन समाजामध्ये दंगल घडविणाऱ्या उद्देशाने स्फोट घडून आणला आहे. यामुळे मस्जिदचे भिंतीला तडे गेलेले असून मस्जीदचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये बीड पोलीसांकडून विजय राम गव्हाणे व श्रीराम अशोक सांगडे या दोन आतंकवाद्यांना अटक करुन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पण सदरचा एफ.आय.आर. पाहता त्यांच्यावर मोघम स्वरुपाचे कलम लावण्यात आलेले आहे. वास्तविक सदरील घटना ही आतंकवादी मानसितेशी प्रेरीत असून यामुळे राज्यासह देशातील मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या असून रोष निर्माण झाला आहे. सदरील आरोपींवर UAPA, NSA, NIA अंतर्गत कलम लावून या आंतकवाद्यांशी कोणत्या आतंकी संघटनेशी संबंध आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे. वरील गुन्ह्यामध्ये संबंधीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही झाल्यास सदरील दहशत वाद्यांचे मनोबत वाढुन भविष्यात असे घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही

तरी माननीय साहेबांनी त्वरीत सदरील पोलीस अधिक्षक यांना वरील गुन्ह्यातील आरोपींवर प्रावक NSA NIA अंतर्गत कलम लावण्याची सूचना करण्यात यावी. अशी मागणी औसा येथील सर्व समाजाच्या वतीने डव्या हातावर काळी पट्टी बांधून दिनांक 2 एप्रिल 2025 बुधवार रोजी  औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी माजी  नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख,सय़्यद मुजफ्फर अली इनामदार, अजरुल्ला हाशमी, खुनमीर मुल्ला,मेहराज शेख,सय़्यद मुखतार इनामदार,मुजाहेद शेख, मारुफ शेख,अनीस जहागीरदार, वहीद कुरेशी, पाशाभाई शेख,सय़्यद खादर, शेख सनाऊल्ला दारुवाले, खाजाभाई शेख, अडवोकेट समियोद्दीन पटेल, अडवोकेट मजहर शेख, अफसर शेख,प्रदीप कांबळे, धनंजय  राचट्टे,युनुस चौधरी,बाबा पटेल,बासिद शेख आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या