औसा येथे रमजान ईद उत्साहात साजरी.

 औसा येथे रमजान ईद उत्साहात साजरी.



औसा प्रतिनिधी..


औसा.मुस्लिम बांधवांकडून


रमजान ईद औसा शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. औसा येथील काझी,काझी मीर मुजम्मील अली  यांच्या नेतृत्वाखाली ईद-ऊल- फित्र  ची सामुदायिक नमाज पठण  झाली. 


रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत 31 मार्च सोमवार रोजी रमजान ईद साजरी केली.


सकाळी  नऊ च्या सुमारास  औसा शहरातून ईदगाह मैदानावर  हजारो मुस्लिम बांधवांनी ईदच्या सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी किल्ला मैदान पासून ते ईदगाह  मैदानावर थेट रॅली काढून ईदगाह मैदानावर जाऊन ईद -ऊल- फित्र  ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर ईदुल फित्रचा खुदबा पठण करण्यात आला. त्यानंतर दुवा करून ईदच्या नमाजाची सांगता झाली. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत


एकमेकांना शुभेच्छा दिल्या.


ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर   औसा तहसीलदार घनश्याम आडसूळ, औसा डीवाय एसपी कुमार चौधरी,औसा पोलीस निरिक्षक सुनील रेजितवाड,नायब तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश शिंदे , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे,  माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे नेते सुनीलप्पा मिटकरी, उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संतोष सोमवंशी, सुरेश भुरे,भाजपाचे अक्रम पठाण,मिनाहाज पटेल,राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत सुर्यवंशी, अविनाश टिके, कृष्णा सावळकर , क्रांतिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव कसबे,  सचीन माळी, हरिभाऊ शिंदे,औसा सज़्जाचे गिरदावर विकास बिराजदार,आदि मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या