इळेकर परिवाराच्या वतीने दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन .

 इळेकर परिवाराच्या वतीने दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन .



औसा प्रतिनिधी 

रमजान च्या पवित्र महिन्याच्या शुभ प्रसंगी  औसा येथील इळेकर  परिवाराच्या  वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले  होते . त्यानिमित्ताने दिनांक 27  मार्च 2025 बुधवार रोजी गांधी चौक, गुरुकृपा निवास महाराज गल्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागेशअप्पा  गुरुपदप्पा इळेकर, वैजिनाथप्पा इळेकर  माजी नगरसेवक, व तसेच सोमनाथ इळेकर माजी उपनगराध्यक्ष व गिरीष नागोराव इळेकर, केदार इळेकर, शिरीषप्पा इळेकर, संकेत इळेकर व इळेकर परिवाराच्या वतीने यांच्या स्वगृही सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी मौलाना यांच्या हस्ते  इफ्तार ची दुआ करून सर्वधर्मीय  दावत ए इफ्तार   पार्टीचे आयोजन करण्यात आले. व त्या नंतर लगेच तेथेच मुस्लिम बांधवांनी मगरीब ची नमाज अदा केली. व त्या नंतर लगेच भोजनाची व्यवस्था केली होती  तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी भोजनाचा आनंद घेतला. व या दावत ए इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात समाजात बंधुता आणि एकता  व शांतीचा संदेश हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानव जातीला संदेश दिला आहे. . या दावत ए  इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवा तर्फे नागेशप्पा इळेकर यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व त्या नंतर मुस्लिम समाजाच्या वतीने इळेकर परिवाराना  कुरान शरीफ भेट दिली. यावेळी  माजी नगरसेवक मुजाहेद शेख, डॉक्टर मुजाहिद शरीफ, मारुफ शेख,वसीमभैय़्या खोजन,अकबर खोजन, जाफर खोजन, मुजफ्फर खोजन, रशीद खोजन, शेख अरबाज खादर,

 एडवोकेट  शाहनवाज पटेल,शेख सनाऊल्ला दारुवाले, अनीस जहागीरदार, एडवोकेट समीयोद्दीन पटेल,शब्बीर शेख, एडवोकेट  फैयाज पटेल,,खुनमीर मुल्ला,  वहीद कुरेशी,खाजाभाई शेख, अरशद कुरेशी, पत्रकार इलियास चौधरी, मुक्तार मणियार,बाबा पटेल,वारीस शेख, चांद भाई शेख, तैयब काझी, मुतलिब सय़्यद, शेरु नांदुर्गे, निशांत राचट्टे,  विरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता ,गितेश शिंदे, इश्वर सावळकर, योगेश सूर्यवंशी, हरीभाई काळेकर, विरेश  कारंजे, अजय शेटे, शुभम पडसलगे, सुमित पारुडकर, कोरे प्रवीण, दिगंबर शालगर, अक्षय मिटकरी,  शिवकुमार मुर्गे, सचिन आदि औसा येथील हिंदू - मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दावत-ए-इफ्तार पार्टीत  उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या