औसा तालुक्यात इतिहास घडणार : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अपक्ष ‘टायगर’ रिंगणात
औसा तालुक्यातील आशिव जिल्हा परिषद व आशिव गणातून २ अपक्ष टायगर, तसेच उजनी जिल्हा परिषद गटातून १ अपक्ष टायगर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सौ. सुरेखा दगडू माने, दगडू वसंत माने आणि समाधान शाहूराज कांबळे हे तिघे उमेदवार पहिल्यांदाच औसा तालुक्याच्या राजकीय इतिहासात सर्वसामान्य मतदार राजाच्या थेट सेवेसाठी मैदानात उतरले आहेत.
विशेष म्हणजे हे उमेदवार ‘शिट्टी आणि बॅट’ या चिन्हावर निवडणूक लढवत असून, तरुणाई, शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक राजकारणाला छेद देत, विकास, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्याला मिळावे, अशी जनभावना व्यक्त होत आहे.
औसा तालुक्यातील ही निवडणूक नवीन विचार, नवीन चेहरा आणि सामान्य माणसाचा आवाज म्हणून ओळखली जात असून, येणाऱ्या काळात या अपक्ष ‘टायगर’ उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या