लोदगा जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी होतील- बिरबल देवकते
औसा प्रतिनिधी
लोदगा जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंप्रभा धनंजय पाटील लोदगा पंचायत समिती गणातून पल्लवी तानाजी घोडके आणि हासेगाव गणातून विद्यमान पंचायत समिती सदस्य उदय सिंग माणिकराव गायकवाड यांच्यासारखे कर्तव्यदक्ष उमेदवार काँग्रेस पक्षाने दिले आहेत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्वयंप्रभा धनंजय पाटील या परसोदा गावच्या आणि औसा तालुक्यातल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या प्रथम महिला चेअरमन असून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर त्या संचालिका असल्याने शेतकरी शेतमजूर यासह महिलां वर्गात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे लोदगा गटातील जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समितीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष बिरबल वैजनाथराव देवकते यांनी केले काँग्रेस पक्षाचे आमचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि आमदार अमित भैया देशमुख व माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली लोदगा गटातील तिन्ही उमेदवारांनी गावोगावी प्रत्येक घरात जाऊन काँग्रेस पक्षाचा विचार पोहोचविला आहे प्रचार फेरी आणि प्रत्येक गावातील पदयात्रेमधून मतदार बंधू-भगिनींचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना उस्फूर्त पाठिंबा मिळत असून यापूर्वी पांडुरंग जेवले यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना या गटात अनेक विकासाची कामे केलेली आहेत लातूर महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेवर आणि औसा पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महिला काँग्रेसचे पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व मित्रपक्ष जोमाने कामाला लागले आहेत हासेगाव लोदगाव शिवनी जमालपुर शिंदाळा खुंटेगाव सारोळा एरंडी होळी तोंडोली कवठा इत्यादी गावातून काँग्रेस उमेदवार पाटील यांना मतदारांची सर्वाधिक पसंती असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे असेही काँग्रेस सेवा दलाचे बिरबल देवकते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले.

0 टिप्पण्या