मदरसा महेदविया बरारची दोन विद्यार्थ्यी झाले हाफीज -ए-कुरआन

 मदरसा महेदविया बरारची  दोन विद्यार्थ्यी झाले हाफीज -ए-कुरआन




मदरसा महेदविया बरार रिलिजियस अँड मॉडर्न एज्युकेशन सेंटर, मोमीन पार्क, अमरावती येथे  दोन होतकरू विद्यार्थ्यांनी पवित्र कुरआन शरीफ संपूर्णपणे मुखोद्गत (हिफ्झ) करून हाफिज-ए-कुरआन होण्याचा मान मिळवला आहे.


संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार सैयद महमूद अफ्फान इब्ने हजरत सैयद नूर मोहम्मद तहसीन मियाँ आणि इरशाद नबी साहेब लोहारें (औसा) या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर हे महत्त्वाचे यश संपादन केले.


या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मदरशाचे शिक्षक, पालक आणि हितचिंतकांनी अल्लाहचे आभार मानत दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि दीन व दुनियेतील प्रगतीसाठी विशेष दुआ करण्यात येत आहे.


मदरसा महेदविया बरार, अमरावतीच्या नावे ही आणखी एक मोठी कामगिरी जोडली गेली असून, या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. अल्लाह या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक बरकत देवो आणि त्यांना जीवनात उत्तरोत्तर यश देवो, अशी सर्वांची प्रार्थना आहे. आमीन!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या