प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल भरण्यासाठी मुदत वाढवून द्या -उमर पंजेशा
औसा प्रतिनिधी
प्रधान मंत्री आवास योजना घरकुल 2.0 भरण्यासाठी शेवट ची तारीख 31 मार्च 2025 आहे, परंतू शहरातील नागरिकांचे कागद पत्र जुळवा जुळव करण्यात वेळ जात आहे काहींचे न. पा. रिव्हिजन 8 अ चे काम पूर्ण झाले नाही, उत्पन्न प्रमाणपत्र पाच पाच दिवस मिळत नाही त्यामुळे अनेक नागरिक घरकुल भरण्यापासून वंचीत राहणार आहेत,
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या महत्वकाक्षी योजने पासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी औसा नगर परिषद मुख्याधिकारी साहेब यांना मुदत वाढवून मिळावी यासाठी निवेदन दिले .
व घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी 8 अ आवश्यक आहे परंतू नगर परिषद अधिकारी 8 अ देण्यासाठी घरपट्टी बरोबर नळपट्टी भरण्याची अट घातली आहे, ती अट रद्द करावी यासाठी ही मुख्याधिकारी साहेब यांना औसा येथील सामाजिक कार्यकर्ता उमर पंजेशा यांनी औसा नगरपालिके चे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या