गुढीपाडव्यानिमित्त औसा येथे संगीत समारोहाचे भव्य आयोजन
औसा प्रतिनिधी
हिंदू संस्कृतीचे नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या वतीने सोमवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय उंबडगा रोड औसा येथे भव्य संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवराज धाराशिवे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. गुढीपाडव्या निमित्त आयोजित संगीत समारोहा मध्ये पंडित वेदांग धाराशिवे, पंडित शिवरुद्र स्वामी, हरिष कुलकर्णी यांचे सुश्राव्य गायन आणि गुरु श्वेता तंत्रे पाटील यांचे सुप्रसिद्ध कथक नृत्य अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये तबला वादन चैतन्य पांचाळ आणि हार्मोनियमची साथ संघटना अविनाश यादव हे करणार आहेत तरी संगीतप्रेमी रसिक स्रोत यांनी संगीत समारोह आणि रोमहर्षक कथक नृत्य अविष्काराचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुक्तेश्वर वागदरे अध्यक्ष श्री मुक्तेश्वर देवालय न्यास औसा यांनी केले आहे.
0 टिप्पण्या