महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती शासन लागू करावे-लोकसत्ता युवा संघटनेची मागणी

 महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती शासन लागू करावे-लोकसत्ता युवा संघटनेची मागणी 




लातूर..

 महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरात काही समाज कंठकाकडून दंगल घडविण्यात आले त्यामुळे तेथील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या तरुणांना अटक करण्यात आली आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मात्र नागपूर महानगरपालिका कार्यालय मार्फत आरोपीचा दोष सिध्द झाला नसताना कायदा सुव्यवस्था मोडून संविधानाचा मान-सन्मान न राखता तसेच न्यायालयात प्रकरण असता न्यायालयाचे आदेश न घेता आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांच्या घरातील जेष्ठ नागरिक तसेच त्यांच्या बायका-लेकरांवर अन्याय केल्याबदल महाराष्ट्रातील सरकार रद्द करुन राष्ट्रपती शासन लागू करावे.


अन्यथा लोकसत्ता युवा संघटना (म.रा.) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या दालनात तिव्र आंदोलन करण्यात येईल आशी माहिती लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांच्यामार्फत महामाहीम राष्ट्रपती  यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनावर  लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  ईलाही बशीरसाब शेख, उमरभाई कलाल,ईरफान बाहरी कुरेशी, आसिफ निचलकर,अमिर पठाण,लतीफ शेख  यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या