मासुर्डी गावचे सुपुत्र वनरक्षक सुनील घोडके सुवर्ण पदक पुरस्काराने सन्मानित*


 *मासुर्डी गावचे सुपुत्र वनरक्षक सुनील घोडके सुवर्ण पदक पुरस्काराने सन्मानित*


औसा : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून वन संपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय पदक देऊन गौरविले जाते. मूळचे  मासुर्डी तालुका औसा  ,सध्या ठाणे वनवृत्तमधून शहापूर तालुक्यातील वनरक्षक सुनिल वसंत घोडके यांना २०२५ चा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुवर्ण पदक व सन्मानपत्र हे गौरवाचे स्वरूप होते. जागतिक वन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते व अप्पर सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक शोभीता बिश्वास यांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला. सन २०२०-२१ या वर्षात शहापूर तालुक्यातील खर्डी वन्यजीवमध्ये कार्यरत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुनिल घोडके यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले होते. अवैधरित्या वन्यप्राणी बाळगणे, अवैध वृक्षतोड, अवैध दारू वाहतूक, अवैध रेती वाहतूक अशा गुन्ह्यांची उकल करत कारवाई करण्याची उल्लेखनीय कामगिरी घोडके यांनी केली आहे. तसेच जंगल बंधारे बांधणे, वन्य प्राण्यांसाठी पाणवठे निर्मिती, वणवे रोखण्यासाठी उपाययोजना, वन संपत्ती बचावासाठी जनजागृती मोहीम आदी उपक्रम राबविले होते. सुनील घोडके यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन २०२०-२१ वर्षातील वन्यजीव व्यवस्थापन कार्य प्रकारातील वनरक्षक घोडके यांना सुवर्ण पदक  प्रधान  करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या