सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध* *राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन*

 *सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध*


*राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन*



 *लातूर जिल्हा बँकेच्या वतीने शानदार सोहळ्यात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार अमित देशमुख यांचा सत्कार* 


लातूर  दि.१६.

हरिराम कुलकर्णी..


लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवत असताना जे विचार अंगिकारले त्याच विचाराला डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सहकार चळवळीत काम करणाऱ्या संस्थामुळे दिशादर्शक कार्य होत  असून  यामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोलाचा वाटा राहिलेला असून भविष्यात सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे लातूर  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केले  

राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दि. १५ मार्च रोजी सायंकाळी शानदार सोहळ्यात सत्कार करण्यात आला. तसेच विधिमंडळ काँग्रेस पक्ष मुख्य प्रतोदपदी निवड झाल्या बद्दल माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते


*लातूर जिल्हा बँकेचा संचालक राज्याचा सहकार मंत्री माझा मोठेपणा*


सहकार मंत्री बाबासाहेब पाटील



यावेळी सत्काराला उत्तर देताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचं मुलगा राज्याचा सहकार मंत्री होतो आज सत्कार होतोय हा योग लोकनेते विलासराव देशमुख साहेब सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यामुळे आला आहे असे सांगून स्वच्छ कारभार कसा करावा हे मी दिलीपराव देशमुख यांच्याकडून शिकता आले धाडसी निर्णय घेणारे दिलीपराव देशमुख यांच्या मुळे आज लातूर बँकेने राज्यात नावलौकिक मिळवला आहे असे सांगून मी इथ पर्यंत आलो त्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अहमदपूर चाकुर तालुक्यातील सोसायटी चेअरमन, शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे हे मी विसरू शकत नाही असे सांगून राज्याचे सहकार मंत्री हे लातूर जिल्हा बँकेचे संचालक हा माझा मोठेपणा आहे असे सांगून राज्यात सहकार चळवळ अधिक मजबूत करण्याचे काम मी करत असताना मी चुकीचे काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले 



जिल्हा बँकेच्या मुख्यालयात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख होते प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, बँकेचे चेअरमन धिरज देशमुख, बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.




यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणाचे  संचालक यशवंतराव पाटील, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, ट्वेंन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन शाम भोसले, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंत देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,लातूर बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, विलास बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपुरकर, पृथ्वीराज सिरसाट, एन.आर पाटील, जयेश माने,लक्ष्मीबाई भोसले,स्वयंप्रभा पाटील,अनिता केंद्रे,राजकुमार पाटील अनुप शेळके,मारूती पांडे,व्यंकटराव बिराजदार, बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव यांची उपस्थिती होती.


*मराठवाड्यातील जिल्हा बँकेला सहकार्य करावे* 


यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी  दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, सहकार चळवळ रूजवत असताना आपण  कधीही  राजकारण आणले नाही त्यामुळेच सहकार क्षेत्रात लातूरचा सहकार पॅटर्न नावलौकिक राहिलेला असून जनसामान्यांच्या हिताला प्राधान्य देवून त्यांच्या हिताच्या अनेक योजना आम्ही राबवल्या त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ शेतक-यांना होवून त्यांचे जीवनमान उंचावले असून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची वाटचाल शुन्यातून झाली असून राज्याच्या मंत्रीपदी विराजमान होत असताना याचा सर्वांना मनापासून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगून  राज्याच्या जिल्हा बँकेकडे लक्ष देत असताना मराठवाड्यातील जिल्हा बँकेला आपण सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करत पाच वर्षात ४ वर्ष ११ महिने सहकार्य करण्यात असले पाहिजे आजचा सत्कार हा मातृसंस्थेकडून होत असल्याने या सर्व बाबींचे आपण घटक असल्याने निश्चित आपण चांगल काम कराल असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त करून यावेळी माजी मंत्री आमदार अमीत देशमुख यांनाही पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या 



*जिल्हयात सहकार चळवळीला गती मिळेल*


*माजी मंत्री आमदार अमित देशमुख*


  लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार मंत्र्यांची बँक आहे कारण या बँकेत ते संचालक आहेत आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगत पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख  म्हणाले की लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय केशवरावजी सोनवणे लोकनेते विलासराव देशमुख हे सहकार मंत्री झाले त्यानंतर नामदार बाबासाहेब पाटील हे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री झाले त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळीची गती वाढेल राजकारण करावे ते निवडणुकीपुरते त्यानंतर समाजकारण करावे हे सूत्र आम्हाला लोकनेते विलासराव देशमुख यांनी दिले आहे काँग्रेस पक्षाने मला मुख्य प्रतोदपदी जबाबदारी दिली ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत लातूर जिल्ह्यातील सहकारातील राहिलेल्या कामांना सहकार मंत्री गती देऊन लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक भक्कम करतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 *सरकारने पाच लाख रुपयांची योजना राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा*


 जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरजजी देशमुख यांनी नामदार बाबासाहेब पाटील यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केला.लातूर जिल्हा बँकेने पाच लाखां पर्यंत शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची योजना यशस्वीपणे राबवली असून त्याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत. ही योजना राज्य सरकारने राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून महाराष्ट्रातील लाखो शेतक-यांना याचा आधार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपुरकर व अशोकराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या सोसायटीचे चेअरमन यांचेकडून सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन संचालक शेतकरी सभासद,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या