क्षत्रिय राजपूत महासभेच्या फाग महोत्सवाचा शुभारंभ..
औसा प्रतिनिधी
औसा तालुका क्षत्रिय राजपूत महासभेच्या वतीने प्रतिवर्षी होली का महोत्सव अत्यंत हर्ष उल्हास मध्ये साजरा करण्यात येतो.या महोत्सवाचा शुभारंभ पारंपारिक ढोलक पूजन आणि मेवाड चे महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य सुजितसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा राजपूत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मसिंह जनकवार न्यायाधीश मुंबई, हृदयरोग तज्ञ डॉक्टर बजरंग दुबे, भगतसिंग गहिरवार, भाजप नेते लातूर मनपाचे माजी नगरसेवक कुलदीप सिंग ठाकूर, भाजपा लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, शहराध्यक्ष सुनील उटगे, महिला आघाडीच्या कल्पनाताई डांगे यांची उपस्थिती होती. औसा तालुका राजपूत महासभेच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार आणि माजी आमदार कुलदीप सिंह ठाकुर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी औसा शहरासह किल्लारी, उजनी, चलबुर्गा, अलमला, मानेगाव, लाडवाडी, लामजना, शंकरा बेलकुंड बोरफळ गावातील शेकडो समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. राजपूत समाज बांधवांनी ढोलक पूजन करून आमदार अभिमन्यू पवार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या समोर रंगपंचमीच्या आगळ्यावेगळ्या उत्सवाचे पारंपारिक गीत म्हणून दाखविले समाजाचे अध्यक्ष संतोष वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेंद्र मिशन यांनी केले.
0 टिप्पण्या