औसा येथे
राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धा
_________________________
औसा प्रतिनिधी
दि. 18 मार्च 2025
औसा येथील माऊली प्रतिष्ठान आणि माऊली संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 22 आणि रविवार 23 मार्च रोजी मुक्तेश्वर मंदिरात राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी बाल गट तर रविवारी खुल्या गटाच्या स्पर्धा होणार आहेत.
बाल गटात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये तर खुल्या गटात प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये ठेवण्यात आले असून गुनानुक्रमे एकूण आठ पारितोषिक आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात खंडू क्षीरसागर, ओंकार चव्हाण, कै. गजेंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ माऊली संगीत विद्यालय, स्व. तुकाराम बुवा पुरी यांच्या स्मरणार्थ माधव पुरी यांनी,
स्व. विजयकुमार जाधव यांच्या स्मरणार्थ दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर, हभप श्रीमंत पांचाळ चिखुर्डा, स्व. कृष्णाबाई कदम यांच्या स्मरणार्थ प्रभू कदम मांजरी इत्यादी मंडळी प्रायोजक आहेत.
या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पं. शिवरूद्र स्वामी, उपाध्यक्ष मन्मथ पाटील, सचिव व्यंकटराव राऊतराव आणि कोषाध्यक्ष हणमंत लोकरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या