भादा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याने , लहान भावंडांना दाखविले सैन्यात अधिकारी होण्याचे मार्ग*


 *भादा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्याने , लहान भावंडांना दाखविले सैन्यात अधिकारी होण्याचे मार्ग*

औसा प्रतिनिधी 

भादा प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सैन्य दलात लखनऊ येथे नायक पदावर कार्यरत असणारे युवराज नारायण मोहिते हे सुट्टीवर गावात आले असता आज त्यांनी भादा प्रशालेत येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना सैन्य दलात अधिकारी कसे व्हायचे याचे सखोल असे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर टॅलेंट असूनही त्यांना करिअर च्या बाबत योग्य असे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहते. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा अधिकारी होण्याचे मार्ग माहिती नसल्यामुळे अनेकजण इच्छा असूनही अधिकारी होऊ शकत नाहीत. हे ओळखून भादा प्रशालेचे माजी विद्यार्थी युवराज मोहिते यांनी शाळेमध्ये येऊन प्रशालेत शिकणाऱ्या आपल्या लहान भावडांना सैन्य दलामध्ये सैनिकासोबतच अधिकारी होण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, कोणकोणत्या संधी आहेत त्या ठिकाणी कसे पोहोचायचे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. भादा प्रशालेतील अनेक विद्यार्थी सध्या पोलीस आणि सैन्य दलामध्ये निवडले जात आहेत. परंतु यापैकी बहुतेक जण हे सैनिक किंवा पोलीस या पदापर्यंतच पोहोचत आहेत . भादा प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना सैन्य दलात अधिकारी होण्याची माहिती नाही हे जाणून युवराज मोहिते यांनी विद्यार्थ्यांना सैन्य दलात कोणकोणत्या अधिकारी दर्जाची कोणती पद आहेत ,ती कशी भरली जातात ,त्याच्यासाठी अभ्यासक्रम कोणता असतो या सर्व बाबीचे मार्गदर्शन केले. सैन्य दलात मध्ये मुलासोबतच मुलींसाठी कोणकोणत्या संधी आहेत, मुलींसाठी खास कोणती पदे आहेत त्यांची निवड कशी होते , त्या सैन्य दलात मुलींच्या भरतीची नियम कसे बदलले आहेत याविषयी माहिती दिली. एखाद्या व्यक्तीच्या यशाची उंची ही तो व्यक्ती कोणत्या पदावर जाऊन पोहोचलाय यापेक्षा तो त्या पदावर इतर किती जणांना घेऊन जातो यावर ठरत असते. युवराज मोहिते हे स्वतः सैन्य दलात नायक  पदावर असूनही त्यांना आपल्या गावातील आपली लहान भावंडे ही सैन्य दलात अधिकारी पदावर पोहोचावीत असे वाटते हे अतिशय अभिमानास्पद आहे. भविष्यामध्ये जे विद्यार्थी सैन्य दलात करिअर करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाळेत बोलून त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही युवराज मोहिते यांनी याप्रसंगी दिले प्रशालेच्या  वतीने युवराज मोहिते यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक आर.बी.अनंतवार प्रशालेच्या मुख्याध्यापिका डी.व्हि.गुरव आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री शिवलिंग नागापुरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या