अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त 60 रक्तदात्यांनी केले रक्तदान
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि औसा जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अमर अशोकराव खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक मार्च 2025 रोजी लातूर अर्बन ब्लड बँक आणि फ्रेंड्स क्लब औसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये औसा शहर व तालुक्यातील विविध जाती धर्माच्या 60 तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करता यावे यासाठी सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
0 टिप्पण्या