औशात महामंडळाच्या सर्व बसेस जून्या बस स्थानकात पूर्वी प्रमाणे चालू ठेवा व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करा.
औसा प्रतिनिधी
जुन्या बसस्थानकाचे दुरुस्ती व रंगरंगोटी करुन जुन्या बसस्टैंड ठिकाणी सर्व गाड्या पुर्वीप्रमाणेच चालु ठेवणे व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी यासाठी एम आय एम च्या वतीने विभागीय नियंत्रक कारयालय, आगार प्रमुख औसा यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचे सविस्तर वृत्त असे
औसा शहरात १९६०-७० च्या दशकात औसा बसस्टैंड हे बांधुन तयार केले होते व व्यवस्थिपणे कार्यरत राहुन शहराच्या गरजा भागवत होते. सदरील बसस्टँड हे योग्य ठिकाणी असल्याने सर्वांना सोईचे व ग्रामिण भागातील ग्रामस्थांनाही सोईचे ठिकाण होते त्यामुळे या भागातील व्यापार वाढण्यास मदत होऊन ग्राहक वर्गालाही मोठा आधार बनुन कमी वेळात अनेक कामे व पायदळी न तुडवता खरेदी व विक्री ती होत आहे. सदरील जुने बसस्टँड ठिकाणी एक रुपयाचाही विकास झालेला नाही. तसेच सदरील बसस्टँडची इमारत ही १९६० च्या दशकातील आहे. ती आजतागायत जशीच्या तशी आहे. तसेच या भागात व जवळच अनेक शाळा विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचेही शाळा कालावधीत मोठी सोय होत आहे. या परिसरात जुन्या बसस्टँड ठिकाणी, अनेक मंदीर मस्जीद, समाज मंदीरे, मोठ्या प्रमाणात दाट वसाहती असल्याने नागरीकांना मोठा आधार व दिलासा आहे.
तसेच वरील जुन्या बसस्टँड लगत पंचायत समिती, भारतीय स्टेट बँक, भूविकास बँक, डी.सी.सी बँक, ग्रामिण रुग्णालय, न्यायालय, इत्यादी अत्यावश्यक कार्यालय सुध्दा आहेत. येथे येणाऱ्या नागरीकांचेही हाल होत आहेत. सदर जुने बसस्टँड हे गावाच्या मध्यभागात असून येथून पुढे जुने गाव आहे.तसेच एम.आय.एम. च्या वतीने एस.टी. महामंडळ यांना माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमधील त्यांनी असे नमुद केले आहे की, सदरील बसस्थानक हे तोंडी वर्ग करण्यात आलेले आहे व बसस्थानक चालु केलेले आहे. जे की, बेकायदेशीर आहे.
तरी मा. साहेबांना विनंती की, आपण विषयांकीत जुन्या बसस्टँड ठिकाणचा परिसर हा विकसित करावा तसेच जुन्या बसस्टँडची रंगरंगोटी, साफसफाई तसेच परिसरात डांबरीकरण करुन जुन्या बसस्टैंड ठिकाणाहुन सर्व ग्रामिण व लांब पल्ल्याचे गाड्या पुर्वीप्रमाणे सोडाव्यात या मागणीसाठी एम आय एम औसा प्रमुख सय़्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी 24 फेब्रुवारी रोजी जूने बस स्थानक औसा येथे एम आय एम औसा प्रमुख सय़्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन करुन औसा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी या निवेदनावर एम आय एम चेअजहर कुरेशी, शेख मौला,हकीम बागवान,इस्माईल बागवान, शेख नय़्युम, शेख अलीम, शेख मुशीर, सरफराज पटेल, इरफान बागवान, मोईन बागवान, शेख हाजी, फय़्याज मैनोद्दीन, इस्माईल, शेख कलीम,सलीम बागवान, कलीम बागवान, आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या