भूकंपग्रस्त गावांच्या विकासासाठी पुनर्विकास आराखडा - आ अभिमन्यू पवार
किल्लारी ग्रामपंचायतीच्या वतीने आ अभिमन्यू पवार यांचा नागरी सत्कार..
औसा - लातूर -धाराशिव जिल्ह्यातील भूकंपाला होवून तीन दशके ओलांडली आहे.भुकंपानंतर त्या गावात करण्यात आलेल्या मूलभूत सुविधा आता अपुऱ्या ठरत असल्याने या दोन जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे .भूकंपग्रस्त ५२ गावांसाठी पुनर्विकास आराखड्याची मागणी मी सरकारकडे केली होती.त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव मागणी सुरू असून यानिमित्ताने संपूर्ण भूकंपग्रस्त गावांचा विकास साधला जाणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
किल्लारी ग्रामपंचायतीच्या वतीने (दि.२२) फेब्रुवारी रोजी आयोजित नागरि सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर सरपंच सुलोचना बाबळसुरे, सुभाष भोसले, सुभाष जाधव, संतोष मुक्ता, धनराज भोसले ,शरद भोसले ,बंकट पाटील,डॉ श्रीनिवास लज्जा , सत्यभामा भोसले, सतीश भोसले ,राजकुमार जळकोटे ,सुधाकर डावखुरे ,सुरज बाबळसुरे ,सुरज भोसले ,अभिजीत बाबळसुरे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार बोलत होते कि किल्लारी गावांच्या विकासाच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे प्रश्न होते निळकंठेश देवस्थान विकास व किल्लारी कारखाना मी मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असताना निळकंठेश्वर विकासासाठी ६८ लाखांचा निधी मंजूर केला होता मात्र जागेअभावी हा निधी परत गेला आता निळकंठेश देवस्थान विकासासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला किल्लारी कारखाना सुरू करण्यात आला आहे.आणि या कारखान्याच्या गाळप क्षमतेचे काम सुरू आहे येणाऱ्या गळीत हंगामात हा कारखाना २५०० पेक्षा अधिक गाळप क्षमतेने सुरू होईल तसेच ३ लाखांपेक्षा अधिक गाळपाचे उदिष्ट पुर्ण करेल.किल्लारी ३० खेडी पाणीपुरवठा पुनर्जीवित करण्यासाठी ३८ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.यावरही हि योजना किल्लारी साठी कमकुवत ठरत असल्यास किल्लारी साठी माकणी धरणातून एक स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा विचार निश्चित येणाऱ्या काळात केला जाईल.
किल्लारीसह परिसरातील विकासाबरोबर कार्ला, कुमठा व मोगरगा गावांच्या पुनर्वसनाचाही विषयासाठी पाठपुरावा सुरू आहे.किल्लारी येथे तात्पुरत्या स्वरूपात बस थांबा निवारा २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच येणाऱ्या काळात किल्लारी कारखान्यासमोर भव्य व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याचे यावेळी बोलतांना आ अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या