रुपामाता मल्टीस्टेट ने विश्वासार्हता निर्माण केली.
आमदार अभिमन्यू पवार
औसा प्रतिनिधी
रुपामाता उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख ॲड व्यंकटराव गुंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि सहकार क्षेत्रातील इतर उद्योगाच्या माध्यमातून अल्पावधीमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे पतसंस्था दूध व्यवसाय, साखर उद्योग आणि सहकारी तत्त्वावरील शेतमाल तारण योजना या सर्वच संस्थेला आई समजून ऊस उत्पादक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी व ठेवीदार यांच्या विश्वासाला पात्र राहून सुरू असलेले कार्य कौतुकास पात्र ठरणारे आहे असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले औसा येथील रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थलांतरित शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कुटुंब प्रमुख ऍड वेंकटराव गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, ह भ प बाबुराव पुजारी, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, अविनाश पवार, बाजार समितीचे उपसभापती भीमाशंकर राचट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की रुपामाता उद्योग समूहाने शेतकरी व ठेवीदारांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. अल्प कालावधीमध्ये ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र राहून उत्तम कार्य चालत असल्यामुळे रूपामाता उद्योग समूहाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. प्रारंभी रूपामाता जोगसमूहाचे संस्थापक ॲड व्यंकटराव गुंडे यांनी प्रास्ताविकातून रूपामाता उद्योग समूहाच्या प्रगतीची आणि वाटचालीची सविस्तर माहिती दिली. आईच्या निधनानंतर आपण चांगल्या कार्याच्या रुपाने आईची सतत आठवण राहावी म्हणून स्थापन केलेल्या सर्वच उपक्रमाला ठेवीदार सभासद व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळत असल्यामुळे आपण हे करू शकलो असे ऍड व्यंकटराव गुंड यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रुपामाता मल्टी स्टेटच्या स्थलांतरित शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी औसा, धाराशिव, तुळजापूर आणि लातूर तालुक्यातील अनेक गावचे सरपंच यांच्यासह ठेवीदार व्यापारी व औसा शहरातील विविध नागरी व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण जंगाले यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय व्यवस्थापक गोपाळ जंगाले, शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले,दीपक ढोक यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या