सावन कोलते भादा जिल्हा परीषद शाळेतून एन एम एस परीक्षेत उत्तीर्ण; शिक्षकांनी केले अभिनंदन
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्यांतील जि. प. प्रशाला,भादा येथील विध्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत केवळ एकाच विद्यार्थ्याने यश संपादन केले असून त्याचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेली राष्ट्रीय दुष्ट्या दुर्बल घटक NMMS परीक्षेत आठवी वर्गामध्ये शिक्षण घेणारा अभ्यास प्रिय विद्यार्थी कोलते सावन पवन हा विदयार्थी शाळेमधून एकमेव पास झाला आहे.यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही हे यश प्रशालेला मिळाले आहे. यासाठी शाळेतील शिक्षक जगताप सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती केंद्रे यांनी परीक्षेचे कामकाज पाहिले. सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले असून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमनाथ लटुरे व उपाध्यक्षा सुनीताताई उबाळे व सर्व सदस्य यांनीही अभिनंदन केले. तसेच सरपंच मीनाताई दरेकर,उपसरपंच बी एम शिंदे,चेअरमन दत्ताकुमार शिंदे, व्हा चेअरमन महेश गायकवाड, राजेंद्र स्वामी, मुख्याध्यापिका गुरव दैवशाला यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या