अजहर हाशमी युवा मंचच्या वतीने व्हाॅलीबॉल स्पर्धाचे आयोजन..
औसा प्रतिनिधी
औसा शहरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हाशमी चषक व्हॉलीबॉल स्पर्धाच्या निमित्ताने अजहर भैय़्या हाशमी युवा मंचच्या वतीने औसा येथे व्हाॅलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी संध्याकाळी हाशमी चौक औसा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धाचे उद्घाटन काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा इंजिनीयर अजहर हाश्मी यांच्या शुभ हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते उस्मानअली खोजन, अकबरअली खोजन, सदानंदआप्पा शेटे, मुबीन शेख, निसार कुरेशी, आदमखा पठाण, चांद भाई सिद्दिकी, मुज़्जमिल काझी, मुजक्कीर काझी, डॉक्टर जिलानी पटेल या मान्यवरांच्या उपस्थितीत व ईनायतअली खोजन यांच्या अध्यक्षतेखाली टॉस फेकून या कार्यक्रमाची सुरुवात वारियर्स विरुद्ध, रोमान एजन्सी या दोन्ही संघाचा पहिला राऊंड सुरू करण्यात आला. या हाश्मी चषक वॉलीबॉल स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या संघाला 37 हजार 313 रुपये अजहर हाश्मी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या क्रमांक येणाऱ्या संघाला 21 हजार 313 रुपये आयएसके डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे. आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या संघाला 11 हजार 313 रुपये सहारा ग्रुप यांच्या वतीने देण्यात येणार आहे.यावेळी या हाश्मी चषक हॉलीबॉल स्पर्धेमध्ये औसा तालुक्यातील अनेक संघानी भाग घेतला आहे यावेळी या हाशमी चषक स्पर्धेमध्ये संघाला भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क 555 रुपये ठेवण्यात आले होते.या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये बेस्ट येणाऱ्या टीमला 5 हजार 313 रुपये भुजबळ डेव्हलपर्स व एके डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे. नंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट नेटरला 1 हजार 313 रुपये जाफर इनायतली खोजन यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. व त्यानंतर बेस्ट शूटर यांना 1हजार 313 रुपये खाजा अजिज शेख यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. व बेस्ट सेटर येणाऱ्या 1 हजार 313 रुपये अरशद निसार कुरेशी तर्फे देण्यात येणार आहे. आणि बेस्ट प्लेअरला 1 हजार 313 रुपये साद गफूरुल्ला हाश्मी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजक खाजाभाई शेख, जाफर खोजन, अरशद कुरेशी, अरशद चाऊस यांनी केले.तर या कार्यक्रमाचे संयोजक सादिक खोजन,आदिल देशमुख,जावेद सिद्दिकी,राजू खोजन,मोहसिन कुरेशी,शोएब पटेल, इरफान मुजावर, फाजील कुरेशी,आरबाज शेख,हमीद सय़्यद, अब्दुल शेख, अन्वर बागवान, साजिद शेख, ऐफाज कुरेशी, फहाद सय़्यद, माया भाव, शहेबाज खान, मजहर खोजन, मुजफ्फर शेख, मुतल्लीब सय़्यद, नांदुर्ग शेख, करीम शेख, मिनाहाज इनामदार, अलताफ तांबोळी, अबुजर शेख, हुजेफ शेख, अबुबक्कर खोजन यांनी संयोजक केले होते . यावेळी औशातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या