भादा शाळेतील दोन विद्यार्थी अभ्यास सहलीसाठी गेले राजस्थानला...*

 *भादा शाळेतील दोन विद्यार्थी अभ्यास सहलीसाठी गेले राजस्थानला...*






औसा प्रतिनिधी 


जिल्हा परिषद प्रशाला भादा व जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा ह्या शाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा परिषद लातूर मार्फत आयोजित राजस्थान येथील शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी गेलेआहेत.समग्र शिक्षा अभियानतील राष्ट्रीय आविष्कार  उपक्रमाअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेमार्फत राज्याबाहेर राजस्थान येथे सात दिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सहलीसाठी भादा जिल्हा परिषद प्रशालेच्या रुद्र सोमनाथ हजारे व कन्या प्रशाला भादा शाळेच्या अंजली राजेंद्र मगर ह्या विद्यार्थ्याची  निवड झाली असून ते या सहलीसाठी रवाना झाले आहेत. लातूर जिल्हा परिषदेमार्फत समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हयातील प्रज्ञावान प्राथमिक ,माध्यमिक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अभ्यास सहल राजस्थान राज्यातील विविध स्थळांना  दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी ह्या कालावधीत भेट देणार आहे . राजस्थान राज्यात विभागीय विज्ञान केंद्र आणि विज्ञान पार्क जयपुर, अलबर्ट हॉल म्युझियम, सेंट्रल म्युझियम, रामनिवास गार्डन, जंतर मंतर जयपुर, अंबर किल्ला व पॅलेस, जल महाल, ब्रम्हा टेंपल, खाजा गरीब नवाज दर्गा, उपविभागीय विज्ञान केंद्र जोधपुर उमेध भवन आदी  ठिकाणी भेट देवून तेथील बाबीचा विद्यार्थी अभ्यास करणार आहेत. जिल्हयातील एकूण 67 विद्यार्थ्याची ह्या अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे.  लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मॅडम यांनी रेल्वेस्टेशनवर येऊन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.मागील महिन्यात मुंबई पुणे येथे आयोजीत सहलीसाठीही भादा शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. भादा शाळेतून निवड झालेल्या ह्या दोन्हीं विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रेमनाथ लटूरे, उपाध्यक्ष सुनिता उबाळे, भादा ग्रामपंचायत सरपंच सौ. मिनाताई दरेकर, उपसरपंच श्री बालाजी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सद्स्य,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दैवशाला गुरव, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश अनंतवार, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या