परमेश्वराला एकपट दान केले तर परमेश्वर अपणाला दहापट दिल्याशिवाय राहत नाही महादेव ढाकणे महाराज आळंदीकर

 परमेश्वराला एकपट दान केले तर परमेश्वर अपणाला दहापट दिल्याशिवाय राहत नाही 

 महादेव ढाकणे महाराज आळंदीकर



औसा-(सा.वा)दि.4

जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भगवंताची आराधना केलीच पाहिजे मग तुम्ही कोणत्याही देवाची पूजा अर्चा करा पण अगदी मनोभावे करा परमेश्वर हा एकच असतो म्हणून आपण धार्मिक कार्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने सढळ हाताने मदत केलीच पाहिजे. आपण जर अशा कार्यामध्ये एक पट दानधर्म केलं तर परमेश्वर आपणाला नक्कीच दहापट दिल्याशिवाय राहत नाही. अशे आव्हान महादेव ढाकणे महाराज आळंदीकर यांनी केले. 

         ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांचे बोरगाव नकलेश्वर येथे        गेल्या वर्षी कलशारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुतीय वर्धापन दिनाचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव ढाकणे महाराज आळंदीकर बोलत होते. 

जगाच्या कल्याणा संताची विभुती या पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी परमार्थ हा केलाच पाहिजे परंतु आताची नवीन पिढी हा मानायला तयार  नाहीये. परमेश्वराने आपणाला जन्म दिला खरा परंतु आपण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आपणाला समजत नाही तरुण पिढी तर दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जाताना पाहावयास मिळत आहे. परंतु अशा तरुण पिढीला सांगायचे कोणी हाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही सांगतो की प्रत्येक नागरिकाने परमार्थ करावा आपल्या संसारातून थोडाफार वेळ काढून उपासना आराधना करावी. परमेश्वराचे नामस्मरण करावे गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून प्रत्येक स्त्री-पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अगोदर आपले कार्य करावे नंतर उरलेल्या वेळेमध्ये का होईना थोड्याफार प्रमाणात तरी भगवंताचे आराधना करावी. आपण जर अशा धार्मिक कार्यामध्ये परमार्थासाठी एक पट दान दिले तर आपणाला परमेश्वर दहापट दिल्याशिवाय राहत नाही एवढे मात्र नक्की असे आव्हान महादेव ढाकणे महाराज आळंदीकर यांनी बोरगाव नकलेश्वर येथे ह भ प ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरीकर यांच्या द्वितीय द्वितीय वर्धापन दिनानिमित्त उपस्थित जनसमुदायास केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या