हाशमी चौक ते बसस्टैंड पर्यंतचा रस्ता तात्काळ दुरुस्ती करा-
सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
हाशमी चौक ते बसस्टैंड व त्यापुढे खादीभांडार ते भादा रस्ता हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून तो तात्काळ चालु करण्यात यावा. तसेच खादीभांडार समोर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्ता हा दोन्ही बाजुने जाणारा मुख्य रस्ता असून यामुळे शहरातील नागरीकांना व जनतेला खुप अडचण येत आहे. तरी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा. तसेच औसा ते भादा रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे.
तसेच किल्ला ते सबस्टेशन पर्यंत रस्त्याचे काम तात्काळ चालु करण्यात यावे. औसातील खानापूर रस्त्याचे काम पुर्वी सुरु करण्यात आले होते. परंतु कच्चे काम करुन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मोठे रस्ते पडले आहे. याच मार्गावर गोपाळपूर हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी भावीक मोठ्या संख्येने येतात तसेच पुढे दर्गा हजरत नक्शेबंद दर्गा आहे. या ठिकाणी जत्रा भरत असते. हाही रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा. तसेच बाहेरुन ग्रामिण भागात येणारे रस्ते वानवडा, अलमला, असे अनेक ग्रामिण भागातील रस्ते खराब झालेले आहे. या रस्त्यांची पाहणी करुन या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
तरी वरील सर्व रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावे व तसेच मंजुर झालेले रस्ते तात्काळ सुरु करण्यात यावेत अन्यथा एम. आय. एम. च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय उपअभियंता यांना आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.तसेच केलेली कार्यवाहीची प्रतही देण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात केली आहे.
0 टिप्पण्या