जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर*
(माध्यमिक गटातून प्रथम अनिता खडके तर द्वितीय अरुणा कांदे यांनी क्रमांक पटकावला )
दि.3 ( लातूर प्रतिनिधी) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सांस्था मुरुड जिल्हा लातूर तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले.
वर्षभरात शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी अनेक उपक्रमशील शिक्षक बांधव विविध नवोपक्रम राबवित असतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. मुलांना प्रगत बनवण्यासाठी शिक्षक बांधव आपापल्या परीने नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतात.
अशा नवोपक्रमशील शिक्षकाच्या उपक्रमाला महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे( SCERT ) संशोधन विभाग मार्फत प्रतिवर्षाप्रमाणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-2025 आयोजित करण्यात आले.
या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी लातूर जिल्हातील 4 माध्यमिक शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र मुरुड डायट यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी नवोपक्रमांची योग्य प्रकारे मूल्यमापन करुन नवोपक्रमातील नाविन्यता तपासण्यात आले.यातूनच निवडक व नाविन्यपूर्ण उपक्रमाची जिल्हास्तरावर निवड करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडक नवोपक्रमास नावे पाठवून देण्यात आली.
माध्यमिक गटातून प्रथम श्रीमती अनिता खडके जि.प.प्रशाला भादा ता.औसा,द्वितीय अरुणा कांदे स्वामी दयानंद माध्यमिक विद्यालय कव्हा,तृतीय डॉक्टर उमकांत जाधव शिवाजी विद्यालय लातूर, चतुर्थ चंद्रदीप नादरगे श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर तर प्राथमिक गटातून प्रथम जाकिर शेख, द्वितीय श्रीमती ज्योती वंजे,तृतीय-श्रीमती शोभा माने जि.प.प्रा.शाळा वानवडा,चतुर्थ-प्रमोद हुडगे जि.प.प्रा.शाळा आटोळा, पाचवा विजय कुमार सूर्यवंशी,उत्तेजनार्थ श्रीमती प्रीती शेळके, श्रीमती रचना पुरी, या उपक्रमशील शिक्षकांना माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या राज्यस्तरीय नवोपक्रमातील सर्व गुणवंत व सहभागी शिक्षकांचे विभागिय संचालक गणपतराव मोरे, उपसंचालक डॉक्टर दत्तात्रय मठपती,डायटचे प्राचार्या डाँ भगिरथी गिरी मँडम , योजना विभागाचे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम,प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मॅडम,माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी ज्येष्ठ अधिव्याख्याता डाँ जगन्नाथ कापसे,डाँ राजेश गोरे,जिल्हा समन्वयक सतिष भापकर,विषय साहाय्यक निशिकांत मिरकले,योगेश्वरी नाडे,मेनकुदळे मॅडम
तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी,मुख्याध्यापक ,तज्ञ शिक्षक,विशेष शिक्षक साधन व्यक्ती. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक महादेव खळुरे, श्रीमती शोभा माने,श्रीमती आनिता येलमटे, डॉ. संदिपान जगदाळे, सतीश सातपुते,आदींनी जिल्हातील सर्व नवोपक्रम स्पर्धेतील गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या