उत्का अ शाळेत विद्यार्थ्यासोबत माता-पालकांच्याही खेळांच्या स्पर्धा संपन्न.....


 उत्का अ शाळेत विद्यार्थ्यासोबत माता-पालकांच्याही खेळांच्या स्पर्धा संपन्न.....

औसा प्रतिनिधी..

        औसा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्का अ या शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या स्पर्धा सोबतच माता पालकांच्या ही स्पर्धा यावर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणात संपन्न झाल्या 

      स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक महादेव खिचडे सर यांच्या हस्ते होऊन माता पालकांच्या संगीत खुर्ची धावणे फुगे फोडणे कमी वेळात बांगड्या भरणे वस्तू लपवणे वस्तू शोधणे अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या आणि 26 पटसंख्या पैकी 23 पालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सर्व खेळांमध्ये प्रथम द्वितीय आलेल्या माता पालकांचे बक्षीस व शाल देऊन येथोचित सत्कार करण्यात आला.मुलांसोबत महिला पालकांच्या ही प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पर्धा घेतल्या म्हणून सर्वांनी समाधान व्यक्त केले. दररोजच्या जीवनात आनंद निर्माण झाला.ही भावना बोलली.

   स्पर्धेमध्ये सौ.अपूर्वा जमादार,पूजा बिराजदार, वर्षा रुद्रवादे,मनीषा रुद्रवाडे,पूजा रुद्रवाडे,महादेव मुळे,शिल्पा स्वामी, दीपाली मुळे, सोनाली पांचाळ,सत्यभामा व्हणाले, मनीषा मोरे, रोहिणी स्वामी, अश्विनी मुळे,पूनम किल्लारे, सुप्रिया मुळे,रुपाली मुळे, व इतर महिला यांनी सहभाग घेतला.स्पर्धा घेण्यासाठी शाळेचे सहशिक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी सर व शाळा सहाय्यक शारदा भोसले मॅडम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या