शेतकर्‍याची लेक सोनाली तुकाराम उजळंबे जर्मनीला रवाना

 शेतकर्‍याची लेक सोनाली तुकाराम उजळंबे जर्मनीला रवाना



 

अभ्यास, जिद्द, चिकाटीच्या जोरावर तांबरवाडी राजेवाडी गावचे शेतकरी तुकाराम उजळंबे यांची लेक


लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी गावचे शेतकरी तुकाराम बब्रुवान उजळंबे व सौ. अल्का तुकाराम उजळंबे या दांपत्यानी गेल्या कित्येक वर्षापासुन एक गोड स्वप्न पहिले होते की,  आपण आपल्या मुलीला उच्च दर्जाच शिक्षण देउन अभियंता करू. सोनालीने आपल्या आई वडीलांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी दिवसराञ अभ्यास केला. अभियंता होउन दाखवलचं ! सोनालीचा शेतकर्‍याची लेक ते अभियंता होणे हा प्रवास खुप खडतर होता. पण सोनालीने या खडतर प्रवासावर मात करत अभियंता पदवी मिळवली. आज तांबरवाडी राजेवाडी गावचा अभिमान साता समुद्रापार घेउन जात एका सर्वसामान्याची लेक जर्मनिला रवाना झाली. ग्रामिन भागातुन सोनालीने आपल प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परीषद शाळा तांबरवाडी व फत्तेपुर येथुन घेतले. आणि मेकॅनीकल इंजिनीयरींग शासकीय काॅलेज धाराशिव येथुन घेतले, तर ॲटोमोबाईल इंजिनीयरींग शासकीय काॅलेज, अवसरी पुणे येथुन घेत नौकरीसाठी के.बी.एस जर्मन कंपनी येथे डिजाईन ॲन्ड डेव्लप्मेंट इजीनीयर म्हणुन एका नामांकीत कंपनीत चांगल्या पदावर अभियंता म्हणुन कार्यरत असुन कंपनीच्या वतिने सोनाली उजळंबे हिने जर्मनिला जाण्याचा बहुमान मिळविला आहे. सोनालीचे वडील शेती व हाॅटेल व आई अंगणवाडी सेविका म्हणुन काम करते. वडील तुकाराम उजळंबे व आई अल्का उजळंबे दांम्पत्यानी संघर्षमय परिस्थीतीत आपल्या मुलीला शिक्षण देउन अभियंता केले. आज या शेतकरी कुटुंबातील सोनाली उजळंबे जर्मनिला गेल्याने सर्वञ उजळंबे कुटुंबियाचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या