औसा बसस्थानकात एस. टी.तिकीट दरवाढीच्या विरोधात एम आय एम चे आंदोलन..

 औसा बसस्थानकात एस. टी.तिकीट दरवाढीच्या विरोधात एम आय एम चे  आंदोलन..








औसा प्रतिनिधी


महाराष्ट्र शासनाने अचानकपणे एस.टी. तिकीटाच्या दरात १५% पर्यंत वाढ करुन सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक धक्का दिला आहे. एस.टी.चा प्रवास हा वयोवृध्द, शाळकरी विद्यार्थी, महिला साठी सुखकर व फायद्याचे मानले जात होते. ग्रामिण भागासह खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात आजही वाट पाहीन पण एस.टी. नेच जाईन या तत्त्वाचा अवलंब प्रवासी करतात. जनतेच्या या विश्वासाला शासनाच्या वतीने तडा देण्यात आला. मागील चार दिवसापुर्वी अचानकपणेच एस.टी.च्या तिकीट दरात प्रवाशाला न सोसणारी १५ टक्के पर्यंतची दरवाढ केल्याने ग्रामिण भागातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे.तरी सदरील भाडेवाढ केलेली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा एम.आय.एम.पक्षाच्या वतीने  तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात  दिला आहे.यासाठी दिनांक 31 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी सकाळी जून्या औसा बसस्थानकात धरणे आंदोलन करुन औसा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,अजहर कुरेशी, शेख नय्युम, शेख सलीम, शेख मुशीर,हारुणखॉ पठाण, शेख अफसर, शेख मौला, इस्माईल बागवान यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या