कु. दिशा उबाळे हीने वडिलांच्या निधनाचे दुःख बाळगून दिली दहावीची परीक्षा......!
औसा तालुक्यातील भादा गावातील एका चिमुकलीच्या वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना परीक्षेला जावे लागल्याची घटना घडली आहे.
अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या आपल्या वडिलांच्या अर्थीला दिशा ने कर्तव्यला प्रमाण मानून परीक्षेला सामोरी गेल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कु. दिशा नागनाथ उबाळे ही भादा येथील शाळेत दहावी ला आहे. तिचा शुक्रवारी मराठी चा पहिला पेपर होता, पण आदल्या दिवशी तिचे वडील नागनाथ उबाळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दिशा चे शिक्षक शिवलिंग नागापुरे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेम लटूरेयांनी तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी दिशाच्या नातेवाईकांची भेट घेऊन समुपदेशन केले आणि वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी परीक्षेसाठी तयार केले.
तिचा नंबर औसा शहरातील अजीम हायस्कुलच्या केंद्रावर आला आहे. सकाळी साडे नऊ वाजता वडिलांच्या अंत्ययात्रा उचल्यावर दिशा ला मोटारसायकलवरून पोहचवले.
तिच्या या कणखर आणि धाडसाचे कौतुक करीत अजीम संस्थेच्या वतीने सुलेमान अफसर शेख,केंद्र संचालक मेटे एस. व्ही, शेख टी. एम,डॉ. सिद्दीकी सर, सय्यद हकीम सर, व माशाळकर सर यांनी तिचे कौतुक करीत तिला शाबासकी दिली.
दिशा उबाळे... तुझ्या या धैर्याला सलाम.......!
0 टिप्पण्या