सोमयागातून सृष्टी सुखमय व्हावी यासाठी सेलुकर महाराजांचे प्रयत्न
महादेव महाराज चाकरवाडीकर
औसा : (यज्ञभूमी सेलू) : वेदामध्ये सोमयागाला मोठे महत्व आहे. कोणतेही यज्ञ हा सृष्टीतील प्रत्येक जीव सुखी व्हावा यासाठी केला जातो. हे कार्य यज्ञेश्वर महाराज यांच्याकडून होत आहे. त्याचा हा प्रय्त्न, कार्य पृथ्वीवरील सर्व जिवांना उपयोगी ठरेल असे प्रतिपादन ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आपल्या किर्तन सेवेतून केले.
वाशिष्ठ चतुरात्र सोमयागाच्या चौथ्या दिवशी ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे कीर्तन झाले त्यांनी कीर्तनातून संतांची संगती अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य जन्म, संतमहात्म्यांची संगत लाभणे अत्यंत दुर्लभ आहे. संतांची संगत पाहिजे, उद्धाराशी हाव नाही भाग्यहीन, विनमुख चरणा संताचिया. या ओवी प्रमाणे एखाद्या वेळेस मनुष्यजन्म मिळून शकतो. एखाद्या वेळेस मोक्ष सुद्धा प्राप्त होऊ शकतो. परंतु महात्म्याची संगत अत्यंत दुर्लभ आहे. महात्म्याची संगत कठीण आहे. पण संत समागम त्याहुन अवघड आहे. एखाद्या वेळेस चंद्रातील अमृत सेवन करता येईल, आस्थाला जाणारा रवी थांबवता येईल, समुद्रातून तरुण जाता येईल. पण त्या साधूंची भेट किंवा समागम अत्यंत दुर्लभ आहे. आणि अशा संतांचा समागम मेळावा, अशी इच्छा महाराज अभंगातून व्यक्त करताना संत समागमे एखाद्या परी असे असणारे संत महात्मा सोमीयागी श्री यज्ञेश्वर महाराज यांचा समागम सानिध्य कृपा प्रसाद आम्हा सेलूकरांना मिळावा अशी इच्छा भगवंताकडे प्रार्थना करतो. अशीच वाशिष्ट सोमयाग सारखे असंख्य यज्ञ व्हावेत. या यज्ञाच्या आहूतीमधून सृष्टीतील पर्यावरणातील अशुद्ध हवा शुद्ध व्हावी. सृष्टीतील मानव जीवन सुखी व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत. वातावरणातील प्रदूषण नाहीसे करण्यासाठी आज पर्यंत शोध लागला नाही. मंत्र उच्चारातून यज्ञाहूती देऊन सृष्टीतील मनुष्यमात्रांचे जीवन सुखमय होण्यासाठी यज्ञेश्वर महाराजांना किशन महाराज सेलुकर रगंनाथ महाराज सेलुकर सह यज्ञेश्वर महाराज सेलुकर या तीन पिढीतील तपस्वी व्यक्तीने भारतामध्ये संस्कृतीचा अभ्यास, सात्विकतेचा अभ्यास, प्रत्येक कुटुंबाचा अभ्यास, गावाचा, देशाचा, जगाचा विचार करून या सोम्यागातून सृष्टी सुखमय व्हावी असा प्रयत्न केला आहे. म्हणून यांच्या वतीने भारत सृष्ठीतील सर्व कुटुंब, समाधानी व निरोगी जीवन प्राप्त करून त्यांचे जीवन सफल करीत आहेत. यासाठीच सेलू गावात वाशिष्ट सोमयाग यज्ञाचा आरंभ करून सर्वांना सुखमय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वाशिष्ट्य चतुरात्र सोमगाचे पाचव्या दिवशी यज्ञ भूमीवर कीर्तन, भारुडे, गणेश याग, नवचंडी याग,आरोग्य शिबिर,भारुड कार्यक्रम,महिला मंडळ भारुडे साजरी केली.महिला मंडळात कानेगाव वाडी,हासेगाव वाडीतून एकत्रित येऊन भारुड,गवळणी,भजन केले.कानेगाव मधून पूनम लोभे, कानेगावचे सरपंच यांनी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनुसया माने, ज्योतिबा मंडळ हासेगाव,सरू लोंढे, बाळू कदम, सविता साठे, कुंभार यांनी यात सहभाग नोंदवला. या यज्ञभुमिमध्ये भाविकांची दिवसेंदिवस मोठी गर्दी होत आहे.
0 टिप्पण्या