*ग्रामपंचायत कार्यालय सारोळा एरंडी व शासकीय रुग्णालयाच्यावतीने शिवाजीराव पाटील,नेताजी सावंत सर,आणि सुभाषराव काजळे सन्मानित*
औसा प्रतिनिधी.
सारोळा (एरंडी) गावचे आदर्श पोलीस पाटील आदरनिय मा.श्री. शिवाजीराव पाटील (आबा)यांची जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता ,आपला प्राण संकटात घालून ,अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या सारोळा गावाला सहीसलामत बाहेर काढण्याचे काम आदरणीय पोलीस पाटील आबा यांनी केले होते. या कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनी सारोळा गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच मा.श्री. समाधानजी पाटील यांनी श्री शिवाजीराव पाटील (आबा) यांचा शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केले. तसेच आपल्या श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी सारोळा तालुका औसा या शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री नेताजी सावंत सर यांनी राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून लातूर जिल्हयाला गोल्ड मेडल मिळवून दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सारोळा गावचे आदर्श पोलीस पाटील शिवाजीराव पाटील (आबा) ,माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसरपंच मा. श्री.शिवपुत्रजी स्वामी , रघुनाथ भोसले,तुकाराम लोंढे ,एरंडी ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष तथा मराठा राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.आकाश पाटील , परमेश्वर पाटील, श्रीराम विद्यालयाच्या वतीने श्री सुरेश कदम सर,महिला आघाडीच्यावतीने चित्रकला बरबडे व भाग्यश्री मांजरे, लातूर येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री माऊली ईदाने आणि डॉ.मनोजकुमार पाटील यांनी व शासकीय रुग्णालय सारोळा यांच्या वतीने तज्ञ वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.प्रतिभाताई गिरी,पल्लवीताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मानित केले. तसेच आपल्या सारोळा (एरंडी) गावचे आदर्श रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले आदरनिय मा.श्री.सुभाषराव काजळे हे नुकतेच सेवानिवृत झाल्यानें व त्यांनी आपल्या गावाला उत्कृष्ट सेवा प्रदान केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या सारोळा गांवचे विद्यमान उपसरपंच मा.श्री. व्यंकटराव उर्फ राहुलजी साळूंके यांच्या शुभहस्ते प्रजासत्ताक दिनी शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मानित केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहन सोहळा मा.श्री.सुभाषराव काजळे यांच्या हस्ते करण्यात आला. तर महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन गामपंचायत सदस्य श्री गौतम लोंखडे यांच्या हस्ते करण्यात आले.या सत्कार समारंभ प्रसंगी सारोळा सोसायटीचे चेअरमन आदरनिय मा.श्री संजयजी पाटील,अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी,जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व कर्मचारी,श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी,संस्थेचे पदाधिकारी,वाचनालयाचे अधिक्षक व कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक , ग्रामपंचायत सदस्या सौ. रेखाताई भोसले, व इतर सर्व सदस्य, ग्रामसेविका कोळी मॅडम,ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी कुंभार बळीराम व नवनियुक्त कर्मचारी अमोल स्वामी,उपस्थित होते.तसेच गावातील अबाल-वृद्ध लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या