ऑनलाईन केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मुदत वाढ द्या
क्रांतिकारी शेतकरी संघटना करणार घंटानाद आंदोलन
औसा :शासनाकडून हमीभाव अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीला एक महिन्याची मुदत वाढ द्या अन्यथा सरकार विरोधात तीन फेब्रुवारी रोजी औसा तहसीलदार कार्याल्यासमोर घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणाचा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.शासनाच्या गचाळ व्यवस्थापनामुळे आतापर्यंत ऑनलाईन झालेले फक्त निम्म्या शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी झाले आहे उर्वरित शेतकऱ्यांना येत्या 31 तारखेपर्यंत न्याय मिळूच शकत नाही त्यामुळे आणखी एक महिना मुदत देणे अत्यंत आवश्यक आहे. महायुती ने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सोयाबीनला प्रतीक्विंटल 6000 रुपये भाव देण्याचे वचन दिलेले आहे. त्याची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजेंद्र मोरे, राजीव कसबे, सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, सुरेश सूर्यवंशी, मच्छिन्द्र कांबळे, दत्ता किणीकर, भुराबाई राठोड, प्रज्योत हुडे, अमर हैबतपुरे आणि हणमंत सुरवसे यांनी तहसीलदार यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देऊन आल्यावर सांगितले.
0 टिप्पण्या