वाशिष्ठ चतुरात्र महासोमयागाला सेलु येथे प्रारंभ
संत महंताची प्रमुख उपस्थिती
आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
औसा/लातूर (महा सोमयाग यज्ञ भूमी) :
सेेलू (ता. औसा) येथे 9 दिवस चालणार्या वाशिष्ट चतुरात्र महासोमयाग यज्ञाहुतीला आज 22 जानेवारी रोजी विविध धार्मिक उपक्रमासह ध्वजारोहनाने प्रारंभ झाला.
लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच परमपूज्य गवामयन सत्र सोमयाजी दीक्षित श्री रंगनाथ कृष्ण सेलूकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बहु सोमयाजी दीक्षित श्री यज्ञेश्वर रंगनाथ सेेलुकर महाराज आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते, राज्यातील सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये वाशिष्ठ चतुरात्र महा सोमयाग यज्ञाला सुरुवात झाली. सर्वप्रथम सोमयाग सेवा समिती, सेलू ग्रामस्थांच्या वतीने गावातील ग्रामदैवत मारूती मंदिर ते नागोबावाडी यज्ञभूमी पर्यंत टाळ, मृदंग, भजन, हरिनामाचा गजर, करत शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर यज्ञ ध्वजारोहण परमपूज्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती, स्वामीजी शंकराचार्य संकेश्वर पीठ कोल्हापूर, स्वामी श्री रामानंद भारती छत्रपती संभाजी नगर, स्वामी श्री हरिहर आनंद भारती धारूर, परमपूज्य श्री माधवानंद सरस्वती स्वामी परमहंस परिब्राजकाचार्य श्री सरस्वती पीठ रंगमपेठ कर्नाटक, पंडितप्रवर श्री गणेशवार शास्त्री द्राविड, श्रीक्षेत्र वाराणसी, प्रमुख मठाधिपती, यज्ञेश्वर रंगनाथ सेलुकर महाराज, श्रीकांत महाराज सेलुकर, श्री राजेंद्र गिरी महाराज देवताळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते यज्ञ भूमीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर आमदार अभिमन्यू पवार यज्ञ भूमीमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर आमदार अभिमन्यू पवार यांनीही औसा विधानसभा मतदार संघामध्ये 125 वर्षाची परंपरा असलेल्या वाशिष्ठ चतुरात्र महासोमयाग पार पडत असल्याने यज्ञासाठी राज्यभरातून आलेले संत महंत, या यज्ञासाठी पुढाकार घेतलेले यज्ञेश्वर रंगनाथ सेेलुकर महाराज यांचा सत्कार केला. या यज्ञासाठी यज्ञ भूमीमध्ये राज्यभरातील संत महंतासह सोमयाग सेवा समितीचे पदाधिकारी अॅडोव्होकेट अरविंद कुलकर्णी, संजय कुलकर्णी, जनार्धन माने, प्रकाश पंडगे, भाजपाचे जिल्हा पदाधिकारी संतोष मुक्ता, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपाचे माजी नगरसेवक सुनील उटगे,गणेश जाधव,बालाजी कुलकर्णी यांच्यासह लातूर जिल्हा औसा तालुका परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या