लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण..

 लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण..



औसा प्रतिनिधी 


23 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे  लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी अमर उपोषण करण्यात येणार असल्याचे ईलाही बशीरसाब शेख यांनी निवेदनात नमूद केले होते.

त्या अनुषंगाने आज दिनांक 23 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे उपोषणास बसले होते.त्याचे सविस्तर वृत्त असे 

 दि. 06 नोव्हेंबर 2024 रोजी मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी.

इमारत व इतर बांधकाम कामगाराची ऑनलाईन पोर्टल बंद करण्यात आली आहे ती पुर्वीप्रमाणे चालू करण्यात यावी.

 रु. 5000/- सानुग्रह अनुदान देण्यात यावे.

प्रलंबीत असलेले नोंदणी नुतनीकरणाचे अर्ज तात्काळ मंजूर करावे.

लाभाचे अर्ज प्रलंबीत आहेत ते तात्काळ मंजूर करावे.

 रु. 6.00 लाख घरकुल कर्ज देण्यात यावे.


या विविध मागण्यांसाठी  लोकसत्ता युवा  श्रमिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे 23 जानेवारी रोजी आमरण उपोषण करण्यात आले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन  देण्यात आले आ

यावेळी लोकसत्ता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख,उमर कलाल, शहराध्यक्ष आसिफ निचलकर,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या