लिंबाळा (दाऊ) येथील जिल्हा परीषद शाळा दर्जेदार शिक्षणासाठी अव्वल ,,
औसा प्रतिनिधी
शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असलेली लिंबाळा दाऊ येथील जिल्हा परीषद शाळा ,,,
औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ येथील जिल्हा परीषद शाळेत विविध उपक्रम साजरे केले जातात .लिंबाळा येथील शाळेमध्ये डिजीटल व ऑनलाईन शिक्षण दिले जाते .जिल्हा परीषद शाळा महटल की बर्याच विद्यार्थ्यांचे पालक कानाडोळा करतात व इंग्रजी माध्यमातुन आपल्या पाल्यांना शिक्षण दयाव अस अनेक आई वडीलांना वाटतं पण लिंबाळा येथील जिल्हा परीषद शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना माञ आपलीच शाळा इंग्लीश स्कुल असल्यासारखा अनुभव येताना दिसतोय .या शाळेमध्ये जास्तीत जास्त इंग्रजी विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जातय ,लिंबाळा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शाळेतील शिस्त ,शिक्षण ,शारिरीक व्यायाम ,रुचकर दिल्या जाणार्या शालेय पोषण आहारा बद्धल माहिती दिली ,शाळेची सुंदर इमारत, शाळेतील वृक्ष, सुंदर अशी ओपन जिम ,विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्यासाठी पाणी ,व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सदैव तत्पर असलेले मुख्याध्यापक शालेय शिक्षण समिती व लिंबाळा दाउ ची ग्रामपंचायत च्या सहकार्यातुन होत असलेला शाळेचा शैक्षणिक विकासाचा चढता आलेख व जेजे.नवं तेते.लिंबाळा दाऊ गावच्या जिल्हापरीषद शाळेला हवं. या ब्रिदवाक्याप्रमाने शाळा करण्याचा आमचा संकल्प असल्याच मुख्याध्यापक धिरजकुमार कोव्हाळे यांनी प्रसारमध्यमांना बोलताना प्रतिक्रीया दिली ,,लिंबाळा दाऊ गावची जिल्हा परीषद शाळेचा शैक्षणीक स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले गावचे सरपंच बालासाहेब लक्ष्मणराव देशमुख,उपसरपंच बबिता भागवत सुरवसे ,शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तेली ,उपाध्यक्ष मेघा लांडगे,मुख्याध्यापक धिरजकुमार कोव्हाळे सह सहशिक्षक व लिंबाळा दाऊ गावचे ग्रामस्थ उपस्थीत होते.
0 टिप्पण्या