अँड. व्यंकटराव गुंड यांना एबीपी माझाच्या वतीने अनमोल रत्न पुरस्कार..

 अँड. व्यंकटराव गुंड यांना एबीपी माझाच्या वतीने अनमोल रत्न पुरस्कार..



 औसा प्रतिनिधी 


रूपामाता उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख सर्वेसर्वा  अँड. व्यंकटराव विश्वनाथ गुंड यांना एबीपी माझाच्या वतीने मुंबई येथील एका भव्य कार्यक्रमांमध्ये अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार एबीपी माझाच्या टीम समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  अँड.व्यंकटराव गुंड यांनी धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी या लहानशा गावातून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करीत रुपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी रुपामाता शुगर चे तीन युनिट, रूपामाता दूध संकलन केंद्र ,शेतमाल तारण योजनेसाठी सुसज्ज अशा वेअरहाऊस चे स्थापना करून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या तालुक्यातील शेकडो लहान व्यवसायिकांना तसेच पशुपालक व ऊस उत्पादक यांच्यासह कृपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून महिला बचत गट व होतकरू तरुण उद्योजकांना अर्थसहाय्य देऊन ग्रामीण भागातील कुटुंबाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली या बाबीची दखल घेऊन एबीपी माझाच्या वतीने त्यांना अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद खांडेकर, भाग्य व्यवस्थापक गोपाळ जगांले, औसा शाखेचे व्यवस्थापक किशोर जंगाले, व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या