आ अभिमन्यू पवारांची पदयात्रा धाराशिव जिल्ह्यात दाखल...

 आ अभिमन्यू पवारांची पदयात्रा धाराशिव जिल्ह्यात दाखल...






लातूर - धाराशिव सिमेवर पारंपारिक वेशभूषेत पदयात्रेचे स्वागत..




वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावेत - आ अभिमन्यू पवार 





औसा - मराठवाड्याचा सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाकडे पाहिले जाते. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असावेत, अशी माझी अपेक्षा होती. यामुळे आई तुळजाभवानीला मी नवस केला होता, असे अभिमन्यू पवार म्हणाले.महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि माझा नवस पूर्ण झाला, म्हणून मी पायी औसा ते तुळजापूर जात आहे. औसा मतदारसंघात सिंचनक्षेत्र वाढविणे, औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती करण्यासह अनेक कामे या पाच वर्षांत पुर्ण केली जाणार अशा भावनाही या पदयात्रे दरम्यान अभिमन्यू पवार यांनी बोलून दाखवल्या.



                         आमदार अभिमन्यू पवार यांची तीन दिवशीय पदयात्रा (दि.२) जानेवारीला धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली आहे. दरम्यान लातूर - धाराशिव जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या उजनी येथे ग्रामस्थांच्या पारंपारिक वेशभूषेत पदयात्रेचे स्वागत करण्यात आले तर धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी आमदार अभिमन्यू पवारांचे हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे. हि पदयात्रा गुरूवारी ताकविकी येथील तुळजाभवानी अन्नछत्र येथे थांबून शुक्रवारी सकाळी तुळजापूर च्या दिशेने रवाना होईल. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी आमदार अभिमन्यू पवारांनी नवस बोलला होता तो पुर्ण झाल्याचे आमदार अभिमन्यू पवार शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बुधवारी सकाळी औसा येथून पदयात्रेला रवाना झाले असून गुरुवारी सकाळी हि पदयात्रा धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली आहे. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात पदयात्रेचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी हि पदयात्रा तुळजापूर च्या दिशेने निघणार असून दुपारी ३ च्या नंतर पदयात्रा तुळजापूर मध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. 


           पदयात्रेत आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता,बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे, अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, औसा शहर अध्यक्ष सुनिल उटगे,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार, बाजार समितीचे संचालक युवराज बिराजदार, प्रवीण कोपरकर,विष्णू कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रविशंकर केंद्रे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दत्ता चेवले, गिरीराज सोमाणी, प्रा शिव मुरगे, लहू कांबळे,बंकट पाटील, अक्रम खान,बालाजी निकम, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन कवठाळे, सचिन आनसरवाडे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

                


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या