जि.प प्रा शाळा चिंचोली तपसे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलें जयंती साजरी
* *भाषण करताना आरव* *सूर्यवंशी वर्ग २री*
*
औसा प्रतिनिधी:-
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती करण्यात आली
हजारो वर्षांपासून गुलामीचे जीवन जगण्यासाठी भाग पाडणाऱ्या मनुवादी व्यवस्थेला मुठमाती देत बहुजन समाजाच्या लेकरांना शिक्षणाची दारं उघडणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाला शतशः नमन व विनम्र अभिवादन आणि तमाम बहुजन समाजाला जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
आज दिनांक 03/ जानेवारी/2025 रोजी जि प प्रा शाळा चिंचोली तपसे ता औसा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.वेशभूषा,भाषण स्पर्धा आणि गीत गायन इत्यादी उपक्रम घेण्यात आले. यावेळी दुसरीच्या वर्गात असलेल्या आरव सूर्यवंशी यांनी आपल्या मोडक्या तोडक्या आवाजात क्रांतीज्योती सावित्रीाईं फुलें याचे जीवनावर थोडक्यात भाषण केले . कार्यक्रमाचे आयोजन मुलींनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या