भिमसैनिकानी कायदेशीर मार्गाने लढावे..अॅड.जयराज जाधव
औसा प्रतिनिधी
औसा-दि. 1/1/2025 रोजी सकाळी ठिक 10.30वाजता औसा येथील हनुमान मंदिरा शेजारी भिमा कोरेगाव युध्दात इंग्रजांच्या बाजूने पेशव्यांच्या विरोधात लढून विजयश्री मिळवणाऱ्या शूर 500 महार सैनिकांना जयभीम घ्या जयघोषात भिमसैनिकानी वतीने मानवंदना देण्यात आली.यावेळी संजय ओव्हाळ व गितेश कांबळे यांनी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले व त्या नंतर औसा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विधीज्ञ समाजभूषण अॅड. जयराज जाधव व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बनसोडे यांनी जनतेस संबोधित केले.अॅड.जयराज जाधव यांनी या प्रसंगी सिधनाक या महार सैनिकांच्या प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तलवारीच्या जोरावर पेशवाई संपवली. सध्य स्थिती तील पेशवाई चे समर्थक अधून मधून डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्या डोक्यातील पेशवाईचे विचार घालवण्यासाठी लेखणी हे शस्त्र वापरून कायदेशीर लढा दिला पाहिजे असे सांगून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेबा विषयी व्यक्त केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माने सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमा कोरेगाव संघर्ष समिती घ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी शहरातील भीमसैनिक शरद बनसोडे, महावीर बनसोडे, मारूती कांबळे, जनार्दन कांबळे सह महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या