दिगंबर माळी यांचे निधन..
औसा प्रतिनिधी
माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष तथा कृषी सेवा केंद्राचे संचालक दिगंबर हरिभाऊ माळी वय 65 वर्ष यांचे बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटाच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दिगंबर माळी हे विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औसा येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरासह नातेवाईक समाज बांधव व असंख्य हितचिंतक उपस्थित होते.
0 टिप्पण्या