मैदानी खेळ गरजेचे - डॉ.अफसर शेख

 मैदानी खेळ गरजेचे - डॉ.अफसर शेख 






औसा प्रतिनिधी 

शेर -ए-हिंद हजरत टिपू सुलतान रहेमतुल्ला अलैही  चषक निमित्ताने व अफसर शेख युवा मंचच्या वतीने औसा येथे व्हाॅलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने आज दिनांक 17 जानेवारी 2025  गुरुवार रोजी औसा येथील सांस्कृतिक सभागृहाच्या समोर मैदानात संध्याकाळी 8 वाजता व्हाॅलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या शुभहस्ते  टॉस फेकून करण्यात आले . यावेळी या स्पर्धेत अनेक संघानी भाग घेतला आहे.

या व्हाॅलीबॉल स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या संघाला 21 हजार रुपये डॉक्टर अफसर शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे.तसेच द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघाला 15 हजार रुपये माजी नगरसेवक गोंवीद जाधव यांच्या वतीने देण्यात येणार  आहे.आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या संघाला 11 हजार रुपये सुलेमान अफसर शेख यांच्या वतीने देण्यात येणार आहे.या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ अफसर शेख म्हणाले अनेक युवक सध्या मोबाईलच्या आहारी गेले आहेत.मैदानी खेळ सोडून मुले मोबाइलच्या गेम मध्ये व्यस्त दिसत आहे.त्यामुळे मी अनेक वर्षांपासून अफसर शेख युवा मंचच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात लहान व मोठ्या मुलांसाठी नेट,बॉल,माती मोफत देण्याची सोय करीत आहे.तसेच सर्वसामान्य खेळाडूंना भाग घेता यावा म्हणून आम्ही प्रवेश फिस नाममात्र 151 रुपये ठेवण्यात आली आहे.मुलांना खेळण्याचे वेध लावत आहे.सध्या मुलांना मैदानी खेळ गरजेचे आहे.जिल्यातील काही गावामधुन अनेक मुले मैदानी खेळ खेळून नौकरीमध्ये भरती झाले आहेत.यामुळे माझीही इच्छा आहे की अनेक तरुण युवक खेळाडू औशातून तयार होऊन खेळामध्ये औशाचा नाव लौकीक करावा व मोबाईलच्या वेसनातून दूर रहावे हिच माझी इच्छा आहे. म्हणून आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून अफसर शेख युवा मंचच्या वतीने व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. असे या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी

माजी नगराध्यक्ष जावेद शेख,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,माजी नगरसेवक विनायक सुर्यवंशी,रुपेश दुधनकर,मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे,युनुस चौधरी, बालाजी शिंदे,अफसर शेख युवा मंचचे सय्यद वकील इनामदार,अमर रेड्डी, अविनाश टिके, कृष्णा सावळकर, बाशीद शेख,अरशद कुरेशी,मुसा बागवान, तांबोळी,जिलानी मुल्ला,दिलावर तत्तापुरे, दादा लोणे,आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या