राजू पाटील यांना बसवरत्न पुरस्कार जाहीर..

 राजू पाटील यांना बसवरत्न पुरस्कार जाहीर..


औसा प्रतिनिधी 

औसा येथिल जेष्ठ पञकार तथा द रिंगण लाइव्हचे संपादक श्री राजू पाटील यांना लिंगायत समाज धाराशीव व बसवरत्न बहूउद्देशीय सामाजिक संस्था उमरगा  यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा ' बसवरत्न गौरव ' पुरस्कार जाहीर झाला आहे.

 येत्या 17 जानेवारी रोजी उमरगा येथे श्रीशैल्य पीठाचे जगदगुरु पू.श्री. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे अमृत हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बसवरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राजू पाटील यांचे वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, मुक्तेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष ऍड मुक्तेश्वर वागदरे, मुक्तेश्वर मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक धनंजय कोपरे, मुक्तेश्वर मंदिर समितीचे ऍड बी. एस. कारंजे, रविशंकर राचट्टे ,प्रकाश वाघमारे, उमाकांत मुर्गे, प्रा. युवराज हलकुडे, मुक्तेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग आप्पा औटी, मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तिपण आप्पा राचट्टे ,मनोगत युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत राजट्टे, औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, व संगमेश्वर ठसे औसा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश अप्पा ठेसे, ज्येष्ठ पत्रकार श्याम कुलकर्णी, विजय बोरफळे, रमेश दुरुकर, संजय सगरे, राम कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या