अजिम शाळेत आपुर्व विज्ञान मेळावा संपन्न..
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील अजिम शाळेत आपुर्व विज्ञान मेळावा २०२५ दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये एकुण ८० प्रयोगाची मांडणी छोट्या बालवैज्ञानिकांनी केली होती. विज्ञान रांगोळी व विज्ञान चित्रप्रदर्शन व विज्ञान भाषण स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते .या अपुर्व विज्ञान मेळाव्यास शाळेचे सचिव ,लातुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ग्रामीण,माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डाॅ.अफसर शेख यांनी भेट देऊन या सर्व उपक्रमाचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देउन मार्गदर्शन केले व आपल्या शालेय दिवसांची आठवण करुन दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख निजामोद्दीन , पर्यवेक्षक डाॅ. खलिल सिद्दीकी,मेटे एस व्ही, विज्ञान विभागप्रमुख सौ. दुरुगकर एन एम, विज्ञान विषयाचे शिक्षक कोळपे जी.डी.,माशाळकर एस.एन.,पटेल आय एच, सौ. शेख जी एच,सौ.सय्यद ए एम, सौ काझी सायमा मॅडम, पटेल एच एम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पठाण समीर सर यांनी केले व आभार डाॅ खलिल सिद्दीकी सर यांनी मानले.
0 टिप्पण्या