धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी औसा येथे चक्काजाम आंदोलन..
औसा प्रतिनिधी
औसा- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मारेकऱ्यांना कठोर शासन द्यावे आणि संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास न्याय मिळावा या मागणीसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी औसा टी पॉईंट येथे
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक ७ जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
संतोष देशमुख यांच्या हत्येस कारणीभूत असलेल्या वाल्मिक कराड ला फाशीची शिक्षा द्यावी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयास न्याय द्या या मागणीचे बॅनर झळकावत सर्वपक्षीय कार्यकत्यांनी औसा येथे चक्काजाम आंदोलन केल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर औसा टी पॉईंट येथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, अखिल भारतीय छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे विजयकुमार घाडगे पाटील, नागेश मुगळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश भुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सनाऊल्ला शेख, गणेश गायकवाड, यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार औसा आणि पोलीस निरीक्षक सुनील रेझीतवाड यांना मागण्याचे निवेदन सादर केले. चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प होती.
0 टिप्पण्या