भादा गावाला जाणा-या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था...
औसा प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लातूरवेस हनुमान मंदिरापासून खादी कार्यालय बौद्ध नगर पर्यंतच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम आणि रस्ता हे काम असताना हा रस्ता हनुमान मंदिरापासून खादी कार्यालयजवळ स्वामी रामानंद तीर्थ पुतळ्या जवळ आलमला गावाकडे जाण्याच्या रस्त्यापर्यंत झाला आहे. खादी कार्यालयाच्या बाजूला भादा आणि आलमला येथून औसा शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत ऊस वाहतुकीचे ट्रक आणि ट्रॅक्टर तसेच अवजड मालाची वाहतूक करणारे ट्रक टिप्पर इत्यादी वाहनामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सापडला आहे या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांमध्ये नाली आणि शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाणी साचत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर वाहनामुळे शिंतोडे उडत आहेत तसेच या ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामी प्रत्यक्ष पाहणी करून शहरातील बौद्ध नगर पर्यंत हा रस्ता तातडीने करावा आणि अनेक दिवसापासून अर्धवट ठेवलेले रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
0 टिप्पण्या