औसा येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा...

 औसा येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा...





औसा प्रतिनिधी 


औसा येथे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अल्पसंख्याक हक्क दीन साजरा करण्याचे आयोजित करण्यात आले होते.त्या निमित्ताने आज दिनांक 18 डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी 11 वाजता टिपू सुलतान उर्दू घर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली हक्क दिन साजरा करण्यात आला.यावेळी  त्यामध्ये अल्पसंख्याकावर होणारे हल्ले , अंन्याय, यांचा निषेध करण्यात आले व अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक,आर्थिक,राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासंबंधी प्रयत्न करत राहू असे ठरविण्यात आले, यावेळी अनेक मान्यवरांनी अल्पसंख्याक हक्क दिना संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी माजी नगर अध्यक्ष मेहराज शेख,व उमर पंजेशा,  माजी नगर अध्यक्ष जावेद  शेख , युनूस चौधरी,साजीद अली काझी,वकील इनामदार, ॲड.शिवाजी सावंत,बालाजी शिंदे, गोविंद जाधव, बासिद शेख,  आनंद अमरदिप बनसोडे , अमर रेड्डी व असंख्य कार्यकर्ते  या कार्यक्रमात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या