परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज औसा बंद..

 परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज औसा बंद..




औसा प्रतिनिधी 



परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाच्या विटंबणेनंतर आता तेथील न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी त्याविरोधात आंबेडकरी तथा संविधानवादी जनतेत संतापाची लाट पसलेली आहे. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा. आनंदराजजी आंबेडकर यांनी सोमवार दि. 16 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. त्या अनुषंगाने सर्व आंबेडकर व संविधानवादी पक्ष-संघटनांच्या वतीने आज 'औसा बंद करून औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे. 

 सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूची सी.बी.आय. मार्फत चौकशी व्हावी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर भा.दं. वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.

 संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीला फूस लावणाऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांना सहआरोपी करण्यात यावे तथा त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावी.

 दंगलीच्या नावाखाली दाखल केलेले, निरपराध आंबेडकरी महिला, युवक व विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हो मागे घेण्यात यावेत.

कोम्बिंगची चौकशी करुन अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी.


चौकशी न करता परभणीच्या आंबेडकरी आंदोलकांवर दाखल केलेले, चुकीचे तिन्ही एफ.आय.आर. रद्द करावेत.

दलित वस्तीत घुसून रिक्षा, मोटार सायकल फोडणाऱ्या पोलीसांची चौकशी करुन संबंधीतावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.अशा विविध मागणी चे निवेदन सकल बौद्ध समाज औसा तालुक्याच्या वतीने 16 डिसेंबर सोमवार रोजी औसा  तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी आनंद बनसोडे, सुनील बनसोडे, अविनाश लोंढे, कल्पना ताई डांगे, राजेंद्र बनसोडे,विशाल बनसोडे, वसंत लोंढे,सुरज बनसोडे, नितीन लोंढे, अविनाश कांबळे, वैभव आडसुळे,प्रेम बनसोडे,धिरज बनसोडे,किरण लोंढे,सुरज शिंदे,, प्रदिप कांबळे, बालाजी बनसोडे,विजय कसबे, संतोष माने,नेताजी बनसोडे, अँड जयराज जाधव,दादा लोंढे,जिवन लोंढे,विजय कांबळे,शुभम बनसोडे मोतीराम कांबळे, आर एस बनसोडे,विकास वाघमारे, सुनील सातपुते, सिद्धार्थ कांबळे, युवराज चव्हाण,  महेश कठारे, सद्दाम पठाण,मैजोद्दीन शेख आदि मोठ्या संख्येने आंबेडकर व संविधान प्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या