औशात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..

 औशात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..


औसा प्रतिनिधी 

औसा येथील श्री मुक्तेश्वर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व  दक्षता समिती अशासकीय सदस्य ,औसा यांच्या उपस्थितीत  राष्ट्रीय ग्राहक  दिन साजरा करण्याचे आयोजित करण्यात आले होते.त्या निमित्ताने  शासनाचे  आदेशाप्रमाणे  ग्राहकांना त्यांचे हक्क, जबाबदाऱ्या त्यांच्या  संरक्षणार्थ  असलेल्या विविध शासकीय यंत्रणा आदि विषयांवर  चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 16 डिसेंबर सोमवार रोजी  दुपारी 2 वाजता औसा येथील श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय औसा येथे श्री दत्ता  मिरकले पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायत लातूर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच  उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे  यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच एस व्हि स्वामी आगार प्रमुख,व युवराज म्हेत्रे गटविकास अधिकारी व कुमार चौधरी  उपविभागीय पोलिस अधिकारी,व तसेच  अखिल भारतीय ग्राहक पंचायत औसा महिला तालुकाध्यक्ष  श्रीमती मंदाडे कौशल्य,व तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत औसा तालुकाध्यक्ष  मोहन (तात्या )माळी , व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष एन जी माळी सर,व तसेच मुक्तेश्वर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य जलसकरे एस एम,व औसा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशप्पा ठेसे,  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला औसा तहसील कार्यालय येथील औसा तहसीलदार घनश्याम अडसूळ,व औसा पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रिंयका बोरकर, यांनी विनीत केले होते. यावेळी या कार्यक्रमात श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या