औसा बसस्थानकातील भंगार बसेस रद्द करून नवीन बसेस तात्काळ देण्यात यावे .एम आय एम ची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा येथील जून्या बसस्थानकाचे संचालन सुरू ठेवण्याबाबत व तसेच औसा बस्थानकातील भंगार बसेस बंद करण्यात यावे यासाठी आगार व्यवस्थापक रा.प.औसा यांना
एम.आय.एम. च्या वतीने निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे
औसा येथील जुन्या बसस्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन जुने बसस्थानक यथास्थित सुरु ठेवण्यात यावे. औसा हे सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. यातील 80% हुन अधिक लोकसंख्या जुन्या बसस्थानकाच्या परिसरात वास्तव्य करते. हे बसस्थानक शहरातील मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथील स्थानिक व्यवसाय, शाळा, शिकवणी वर्ग आणि दैनंदिन व्यवहार यांच्यावर त्याचा मोठा प्रभाव आहे. जुने बसस्थानक हे अनेक लहान व्यापाऱ्यांचे उपजिविकेचे मुख्य साधन आहे. या भागातील विक्रेते छोटे दुकानदार, फळ-भाजीपाला विक्रेते आणि छोटे व्यवसाय त्यांच्या रोजीरोटीचे मोठ्या प्रमाणावर या स्थानकावर अवलंबुन आहे. तरी जुन्या बसस्थानकाचे नियमित संचलन सुरु ठेवावे आणि नविन बसस्थानकाचा प्रकल्प भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या आवश्यकतेनुसार कार्यान्वीत करावा व तसेच औसा बसस्थानकातील कांही बसेस अत्यंत भंगार झालेल्या असून यामुळे नागरीकांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता. कांही बसेस मधुन हलतात तर कांहींना एकही काच नाही. तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस जास्त आहेत ग्रामिण भागात रस्ता लहान असतो व झाडे जास्त प्रमाणात असता त्यामुळे सर्व भंगार (15 वर्ष जुने बसेसे) जसे MH 20 BL 0489, MH20 0338, MH 14 1438 अशा अनेक बसेस तात्काळ रद्द करण्यात यावेत.अशी मागणी औसा येथील एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या