आलमला येथे लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा
औसा प्रतिनिधी
दिनांक 6 /12/ 2024 रोजी मौजे आलमला तालुका औसा या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने श्रमदानातून नाल्याच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहावर वनराई बंधारा बांधण्यात आला या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा अभियानाची जागृती शेतकरी वर्गामध्ये करण्यात आली या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होते या बंधाऱ्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा ज्वारी पिकाकरिता संरक्षित पाणी देण्यास मदत होते या बंधाऱ्या बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये सिमेंटाची मोकळी पोती घेऊन त्यामध्ये वाळू आणि माती भरून पोती शिवली जातात आणि नाल्याच्या अरुंद भागामध्ये आडवा पोत्याचा थर टाकला जातो मधल्या बाजूने माती लावून घेतली जाते व वनराई बंधारा तयार केला जातो वरील कार्यक्रमांमध्ये कृषी सहाय्यक कंदले अण्णा, कृषी पर्यवेक्षक शिंदे यांची मंडळ कृषी अधिकारी स्वामी डी आय, गावचे सरपंच विकास वाघमारे, उपसरपंच इरफान मुलांनी, शरद कदम, सिद्धलिंग बिराजदार, तसेच अलमला गावातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.
0 टिप्पण्या